Pawar-Thackeray worried about winning the mini assembly seat

महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ब-याच कालावधीनंतर वर्षा निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेस पक्षाकडून पदोन्नती आरक्षणासंदर्भात देण्यात येणारे इशारे आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात महत्वाच्या चर्चा झाल्याचे समजते.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ब-याच कालावधीनंतर वर्षा निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेस पक्षाकडून पदोन्नती आरक्षणासंदर्भात देण्यात येणारे इशारे आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात महत्वाच्या चर्चा झाल्याचे समजते.

    व्यापारी वर्गात टाळे बंदीमुळे मोठी नाराजी

    राज्यात गेल्या दिड महिन्यापासून कोरोना निर्बंध आहेत त्या पार्श्वभुमीवर व्यापारी वर्गात टाळेबंदीमुळे मोठी नाराजी आहे, राज्य सरकारला तिस-या लाटेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून संपूर्णत: निर्बंध उटवणे योग्य वाट त नाही. तर व्यापारी संघटना आता न्यायालयात गेल्या आहेत या मुद्यावर सुवर्णमध्य कश्या प्रकारे काढता येईल याबाबत पवार यांच्याकडून मार्गदर्शन झाल्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

    काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्याशी भेट

    या सूत्रांनी सांगितले की पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर येत्या दोन दिवसांत कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची वेळ मागितली आहे या मुद्यावर विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्याबाबत या भेटीत पवार यांच्याशी मुख्यमंत्र्यानि चर्चा केल्याची शक्यता असल्याचे या सूत्रांनी सांगितले.