मविआ सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे ; तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही : नवाब मलिक

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले आहे हे रश्मी शुक्लाच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत राहिले. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही. त्या रिपोर्टमध्ये नावे आहेत त्यानुसार बदल्या झाल्या नाहीत. फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. बदलीची प्रोसिजर काय आहे. त्याच्यात बोर्ड आहे. एसीएसहोमच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असते. ते शिफारसी करते. कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजीच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का? असा गंभीर सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

    आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. या आरोपाला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले आहे हे रश्मी शुक्लाच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत राहिले. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही. त्या रिपोर्टमध्ये नावे आहेत त्यानुसार बदल्या झाल्या नाहीत. फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. बदलीची प्रोसिजर काय आहे. त्याच्यात बोर्ड आहे. एसीएसहोमच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असते. ते शिफारसी करते. कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजीच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का? असा गंभीर सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

    त्या रिपोर्टच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचे काम फडणवीस करत होते. कालच फडणवीस यांचे असत्य काय आणि सत्य काय हे जनतेसमोर ठेवले आहे. भाजपाला सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून ते हे सगळे उपद्रव करत आहेत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.