Mahavikas Aghadi government once again made administrative changes; Lokesh Chandra as General Manager of BEST

महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रशासकीय फेरबदल केले आहे. त्या अंतर्गत वरिष्ठ अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्त केले आहे, तर लोकेश चंद्र यांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी दिली आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रशासकीय फेरबदल केले आहे. त्या अंतर्गत वरिष्ठ अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना एमएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्त केले आहे, तर लोकेश चंद्र यांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी दिली आहे.

    बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे दीड महिन्यापूर्वी प्रतिनियुक्तीवर दिल्लीत गेले आहेत. त्यांचे पद रिक्त होते. त्यावरून पालिकेच्या बेस्ट समिती सभेत भाजपने विरोधही केला होता.

    दीड महिने पद रिक्त असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचा आरोप केला होता. अखेर गुरूवारी या पदावर सरकारने सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र यांची नियुक्त केले आहे.