Mahavikas Aghadi leaders had a long meeting with Union Road Development Minister Nitin Gadkari; Discuss the political situation

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यंची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली(Mahavikas Aghadi leaders had a long meeting with Union Road Development Minister Nitin Gadkari). साडे पाचच्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत राज्यातील रस्त्याचे नवे प्रकल्प यासह खड्ड्यांच्या समस्येमुळे चाळण झालेल्या राज्यभरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

  मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यंची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली(Mahavikas Aghadi leaders had a long meeting with Union Road Development Minister Nitin Gadkari). साडे पाचच्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत राज्यातील रस्त्याचे नवे प्रकल्प यासह खड्ड्यांच्या समस्येमुळे चाळण झालेल्या राज्यभरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

  प्रदिर्घकाळ चाललेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या आढाव्यासंदर्भातल अधिकारी  उपस्थित होते.

  मुंबई गोवा महामार्गासह रखडलेल्या प्रकल्पावर चर्चा

  याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गाच्या बांधकामाबाबत नुकतेच न्यायालयाने ताशेरे मारल्यानंतर सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग गेल्या दहा वर्षापासून रखडला आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिले होते. त्यामधून शिवसेनेचे काही लोकप्रतिनीधी राज्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामामध्ये अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यानी केली होती. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासकामांच्य आड कुणालाही येवू देणार नसल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार या बैठकीत स्वतंत्र चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  पावसाळ्यानंतर भूमिपूजनाचा धडाका

  नितीन गडकरी यांनी राज्याच्या रस्त्याच्या कालबध्द विकासावर लक्ष केंद्रीत केले असून अनेक ठिकाणी पावसाळ्यानंतर भूमिपूजनाचा धडाका सुरू केला जाणार आहे. पुण्यात नुकतेच पुलाचे भूमिपूजन पार पडले. तसेच अहमदनगर एका कार्यक्रमात शरद पवार आणि गडकरी एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी गडकरींनी उत्तर महाराष्ट्रासाठी विकासकामे करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार महाराष्ट्राच्या विकासात महत्वाच्या रस्त्यांच्या कामांबाबतच या बैठकीत चर्चा झाली. या शिवाय सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या ताणलेल्या संबंधाबाबतही या बैठकीत काही राजकीय चर्चांझाल्याचे सांगण्यात येतआहे मात्र या चर्चेचा तपशिल कळू शकला नाही.