governor and aghadi meeting

विधान परिषदेच्या बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची (Meeting With Governor Bhagat singh Koshyari) भेट घेतली.

  मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) आणि ठाकरे सरकारमध्ये सुरु असलेल्या विधान परिषदेच्या बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची (Meeting With Governor Bhagat singh Koshyari) भेट घेतली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांना भेटले आहेत.

  मागील सप्ताहात भेट टळली
  मागील सप्ताहातही महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र राजभवनाकडून वेळ मिळाली नाही. त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून १ सप्टेंबरला भेटीसाठी वेळ देण्यात आली होती.

  उच्च न्यायालयाचे भाष्य
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वातंत्रयदिन कार्यक्रमानंतर पुण्यात राज्य सरकार बारा जागांसाठी पाठपुरावा करत नसल्याचे विधान कैल होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानेही बारा सदस्यांच्या नियुक्तीबाबत बिलंब झाल्यावरून राज्यपालांच्या भुमिकेवर भाष्य केले होते.

  ही आहेत बारा नावे
  महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.