मुख्यमंत्री सहकुटूंब मुंबादेवीच्या, अजित पवार, जयंत पाटील सिद्धिविनायकाच्या, संजय बनसोडे चैत्यभुमीच्या दर्शनाला: महाविकास आघाडीच्या नेत्यांची श्रध्दास्थळी भेट!

मुख्यमंत्र्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यानी देखील देवीचे दर्शन घेतले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी चैत्यभुमीवर जावून बाबासाहेबांना वंदन केले, तर अन्य राज्यमंत्री आदिती तटकरे यानी पाली येथे महागणपतीचे दर्शन घेतले. कोरोना संसर्गामुळे सहा महिने मंदिरांत प्रवेशबंदी होती. मात्र आता नियमांचे पालन करत सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत.

    मुंबई: राज्यातील मंदीरे बंद करणारे आघाडी सरकार नास्तिक असल्याचा आरोप भाजप आणि प्रमुख विरोधीपक्षांनी गेल्या काही महिन्यात केला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदीरे सुरू होताच सहकुटुंब मुंबादेवीचे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, जयंत पाटील यांनी सिध्दीविनायकाचे दर्शन घेत आपली श्रध्दा, भावना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यानी देखील देवीचे दर्शन घेतले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी चैत्यभुमीवर जावून बाबासाहेबांना वंदन केले, तर अन्य राज्यमंत्री आदिती तटकरे यानी पाली येथे महागणपतीचे दर्शन घेतले. कोरोना संसर्गामुळे सहा महिने मंदिरांत प्रवेशबंदी होती. मात्र आता नियमांचे पालन करत सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत.

    कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे

    यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आजपासून मंदिर आणि प्रार्थना स्थळे खुली झालेली आहेत. सर्व जनतेला, भक्तांना, विनंती आहे की आनंदी राहा सुरक्षित रहा” कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

    प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड आणि तंत्रज्ञान

    सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त आणि पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड आणि तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतुक केले.