बारा सदस्यांच्या नियुक्तीचा मुहूर्त पुन्हा लांबला ; महाविकास आघाडीच्या नेत्यांची राजभवनची भेट रद्द!

सुमारे आठ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा त्यामुळे पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते संध्याकाळी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, आज होणारी ही भेट रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

    मुंबई : महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेवून त्यांना बारा विधान परिषद सदस्यांबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती करणार आहेत असे पुण्यात अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार आज सायंकाळी सहा वाजता भेट देण्याचे ठरले. मात्र पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांची ही भेट रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    आठ महिन्यापासून प्रलंबित

    सुमारे आठ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा त्यामुळे पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते संध्याकाळी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, आज होणारी ही भेट रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तर राजभवनातूनही याबाबत आज भेट नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता ही भेट होणार नसल्याने बारा सदस्यांच्या नियुक्तीला मुहूर्त पुन्हा लांबल्याचे स्पष्ट झाले.