महाविकास आघाडीचा भाजपला ‘महाझटका’; चार जागांवर आघाडी

मुंबई : विधानपरिषदेच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ तसेच धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघाच्या मतमोजणीत रात्री उशीरा जाहीर झालेल्या एकमेव निकालानुसार भाजपचे अमरिश पटेल यांनी धुळे नंदुरबार स्था. संस्था मतदारसंघात अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रीया सुरू असून ती पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे.

रात्री उशीरापर्यंतच्या हाती आलेल्या दोन फे-यांमध्ये सत्ताधारी आघाडीचे चार तर एक अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडीचे सर्व पक्ष अशी चुरस निर्माण झाली आहे.

रात्री उशीरा हाती आलेल्या माहितीनुसार धुळे नंदुरबार स्थानिक संस्थामध्ये महाविकास आघाडीची ११५ मते फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीचे ११५ मत फुटली, भाजपची १९९ तर महाविकास आघाडीचे २१३ मतदान असतानाही, महाविकास आघाडीच्या ११५ मतदारांची  मते फुटल्याने काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा पराभव झाला.  भाजपचे अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमरिश पटेल यांना ३३२ मते, काँग्रेसचे अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. असे असले तरी पटेल यांचा कार्यकाळ केवळ वर्शभराचा राहणार आहे. हा विजय वगळता अन्य पाच मतदारसंघात मात्र पहिल्या दोन फे-यांमध्ये भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहिले आहेत. त्यात

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांची आघाडी कायम आहे ते प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांच्या पेक्षा साधारण दहा हजार मतांनी पुढे आहेत. आतापर्यत ६५ ते ७० हजार मतांची छाननी झाली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत. अपक्ष उमेदवार अँड. किरण सरनाईक ६ हजार ०८८ मतांनी आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५ हजार १२२ मतांनी द्वितीय क्रमांकावर. शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर ४८८९ मतांनी तृतीय क्रमांकावर राहिले.

औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत झाली. तर पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवार आणि अपक्ष म्हणून मैदानात असलेले दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत झाली.

रात्री ९.३० पर्यत हाती आलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद मध्ये पहिल्या फेरीत सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) २७८७९, भाजपचे शिरीष बोराळकर १०९७३ बाद मते ५४०० निकाल १६९०६ मतांनी चव्हाण आघाडीवर होते.

नागपूर पदवीधर निवडणूक २०२०( पहिली फेरी) २८००० मतांची मोजणी झाली त्यापैकी २५७६६ वैध मते २२३४ अवैध मते  कॉंग्रेसेच अभिजित वंजारी – १२६१७, भाजपचे संदीप जोशी- ७७६७, नितीन रोंघे- ६६, नितेश कराळे- १७४२, राजेंद्र भुतडा- ४३५
अभिजित वंजारी ४८५० मतांनी पुढे होते.

अमरावती शिक्षक मतदार मतमोजणीमध्ये दुस-या फेरीनंतर किरण सरनाईक ६०८८ डॉ धांडे भाजो २१२७ प्रा श्रीकांत देशपांडे ५१२२ महाविकास  अपक्ष शेखर भोयर ४८८९ मते मिळाली आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढले. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली