आज महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद; राजभवनासमोर काँग्रेसचे ‘मौनव्रत आंदोलन’

लखीमपूर खिरी हिंसाचार(Lakhimpur Kheri violence) आणि शेतकरी मृत्यू प्रकरणात देशभरातून केंद्र तसेच उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी 11 तारखेला(आज) महाराष्ट्र बंदची(Maharashtra bandh) हाक दिली आहे. तसेच, काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

    मुंबई: लखीमपूर खिरी हिंसाचार(Lakhimpur Kheri violence) आणि शेतकरी मृत्यू प्रकरणात देशभरातून केंद्र तसेच उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी 11 तारखेला(आज) महाराष्ट्र बंदची(Maharashtra bandh) हाक दिली आहे. तसेच, काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

    केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तरप्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली आहे. उत्तरप्रदेशात कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास जाऊ दिले नाही. काँग्रेसच्या खासदाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली. लखीमपूर खीरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

    लखीमपूरमधील एका घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच टाळेबंदी करून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप प्राणपणाने या बंदला विरोध करेल. जर कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

    पुण्यात महाराष्ट्र बंद प्रातिनिधीक स्वरुपात पाळण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. बंद दरम्यान व्यापारी काळ्या फिती लावून काम करणार असून दुकाने मात्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मुंबईच्या डबेवाला संघटनेने बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.