सामान्यांच्या खिशाला कात्री लावून कोटीची कमाई करणार्‍या मोदी सरकारचे हेच का अच्छे दिन? – तपासे

ऑगस्ट महिन्यात साडे पंधरा लाख लोकांचे रोजगार गेले. बेरोजगारीने साडे आठ टक्क्याच्यावर उच्चांक गाठला आहे. लोकांचा खिसा खाली करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. पेट्रोल- डिझेल - गॅसमध्ये सवलत देण्याऐवजी केंद्र सरकार कोटीत कमाई करत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गेल्या दीड वर्षात आर्थिक चक्र बिघडवले आहे, असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

    मुंबई : एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावत पेट्रोल- डिझेलवरील एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यामुळे मोदी सरकारचे हेच अच्छे दिन आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

    ऑगस्ट महिन्यात साडे पंधरा लाख लोकांचे रोजगार गेले. बेरोजगारीने साडे आठ टक्क्याच्यावर उच्चांक गाठला आहे. लोकांचा खिसा खाली करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. पेट्रोल- डिझेल – गॅसमध्ये सवलत देण्याऐवजी केंद्र सरकार कोटीत कमाई करत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गेल्या दीड वर्षात आर्थिक चक्र बिघडवले आहे, असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

    दरम्यान सर्वसामान्यांना सवलत देण्याचे धोरण मोदी सरकारकडे नाही हे आता स्पष्ट झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले. प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख देईन असं निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी म्हटले होती, कुठे आहेत ते १५ लाख? काळा पैसा परदेशातून भारतात आणतो असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, मोदी यांनी जी आश्वासनं दिली होती, त्यापैकी कोणती कामे त्यांनी करुन दाखवली हे सांगावे, उलट मोदी सरकारने सामान्यांचे जगणे अवघड करुन सोडले असा आरोप महेश तपासे यांनी केला.