माहिममध्ये आज ५ कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : माहिम भागात आज कोरोनाच्या ५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ५९ वर्षाचा पुरुष माहिम बस डेपो भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर अरिहंत हॉस्टेल, कापड बाजार येथील २५ वर्षीय महिलेला कोरोना झाला

मुंबई : माहिम भागात आज कोरोनाच्या ५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ५९ वर्षाचा पुरुष माहिम बस डेपो भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर अरिहंत हॉस्टेल, कापड बाजार येथील २५ वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. निर्मल हौसिंग सोसायटीमधील १८ वर्षाच्या तरूणाला आणि रहेजा क्वार्टर्समधील २१ वर्षाच्या तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कटारिया रोड येथील ४१ वर्षीय एका पुरुषाला कोरोना झाला आहे. माहिममधील कोरोनाबाधितांचा आकडा आज ५ रुग्णांची नोंद झाल्यानंतर ११२ वर पोहोचला आहे. त्यातील २८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.