माहिम, शिवाजी पार्क, दादर, चेम्बूर आणि गोवंडी; नारायण राणेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून 19 गुन्हे दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन, पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय गर्दी जमविणे याबाबत हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आग्रीपाडा आणि माहिम पोलिस ठाण्यात सर्वाधिक 3-3 गुन्हे दाखल करण्यात आले असून सायन, गोवंडी, पोलिस ठाण्यात 2-2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर आझाद मैदान, गावदेवी, काळाचौकी, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, विलेपार्ले, खेरवाडी, आणि विमानतळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे एकूण 19 ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर मुम्बई पोलिसाकडून विले पार्ले, खेरवाडी, माहिम, शिवाजी पार्क, दादर, चेम्बूर आणि गोवंडी पोलिस स्थानकांमध्ये आयोजकावर 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    कोरोना नियमांचे उल्लंघन, पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय गर्दी जमविणे याबाबत हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आग्रीपाडा आणि माहिम पोलिस ठाण्यात सर्वाधिक 3-3 गुन्हे दाखल करण्यात आले असून सायन, गोवंडी, पोलिस ठाण्यात 2-2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर आझाद मैदान, गावदेवी, काळाचौकी, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, विलेपार्ले, खेरवाडी, आणि विमानतळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे एकूण 19 ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

    त्यात भादवि 188 बेकायदा जमाव जमविणे, 51 पोलिसांच्या परवानगी शिवाय गर्दी करणे आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबाबतचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.