महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; मुंबई, ठाणे, पुणे, नागरपुरसह अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तर काहींचे प्रमोशन

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बऱ्याच अधिकाऱ्यांना प्रमोशनसह बदली दिली गेली आहे(Maharashtra Police Officers Transfer). यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक अशा पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागरपुरसह अनेक ठिकाणच्या 30 हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत(Maharashtra Police Officers Transfer). सोमवारी रात्री उशीरा गृहखात्याने हे बदलीचे आदेश काढले.

  अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बऱ्याच अधिकाऱ्यांना प्रमोशनसह बदली दिली गेली आहे(Maharashtra Police Officers Transfer). यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक अशा पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (सीआयडी) येथे प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे तर, सीआयडीचे प्रमुख असलेले अतुलचंद्र कुलकर्णी यांची राज्य कारागृहाचे (सुधारसेवा) प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (Maharashtra Police Officers Transfer ).

  पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांची ठाणे येथे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर, दक्षिण विभागचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त आर. बी. डहाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  पिंपरी चिंचवड येथील उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने गुन्हे अन्वेषण विभागात उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]