देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा; उद्धव ठाकरेंना रामदास आठवलेंची विनंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्यक्तिगत बैठक पार पडली आहे. या बैठकीवर आता केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करावे. भाजपासोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी विनंती रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्यक्तिगत बैठक पार पडली आहे. या बैठकीवर आता केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करावे. भाजपासोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी विनंती रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

    फडणवीसांना मुख्यमंत्री करा

    उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन करून भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी असल्याचे आठवले म्हणाले. दरम्यान शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. त्यांनी भाजपसोबत येऊन मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

    मराठा आरक्षणासाठी आठवले-पवार भेट

    आठवले यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. या भेटीत मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावर चर्चा झाली. तसेच देशभरातील क्षत्रियांनाही आरक्षण मिळावं याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याशिवाय पदोन्नतीतील आरक्षणावरही चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करायला हवी. त्यासाठी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, या मुद्द्यावर पवारांनी सहमती दर्शविल्याचंही आठवलेंनी सांगितले.

    हे सुद्धा वाचा