प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावासाठी आर्थिक तरतूद करा; भाजपाची मुंबई पालिका आयुक्तांकडे मागणी

यंदाच्या गणेशाेत्सवासाठी (Ganesha festival) प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी तसेच त्या निधीची वापर करण्याचे आदेश संबंधिताना तत्काळ द्यावेत, अशी मागणी भाजपने (The BJP has demanded) पालिका आयुक्त (Mumbai Municipal Commissioner) इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याकडे केली आहे.

    मुंबई (Mumbai). यंदाच्या गणेशाेत्सवासाठी (Ganesha festival) प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी तसेच त्या निधीची वापर करण्याचे आदेश संबंधिताना तत्काळ द्यावेत, अशी मागणी भाजपने (The BJP has demanded) पालिका आयुक्त (Mumbai Municipal Commissioner) इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याकडे केली आहे.

    गणेशाेत्सव काळात दरवर्षी विभागवार गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था महापालिकेतर्फे केली जाते. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताे. परंतु या वर्षी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव बांधण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत आश्चर्यकारक आणि अनाकलनीय आहे. याला पर्याय म्हणून महापालिका ट्रक सारख्या वाहनातून गणेश मुर्ती वाहून नेणार, असा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे समजते. या निर्णयामुळे गणेश मुर्तींचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशी भुमिका भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी घेतली आहे. पालिकेने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी आर्थिक तरतूद न केल्यास भाजपा स्वखर्चाने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव उभारेल, त्याला प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी  विनंती पालिका आयुक्तांकडे करून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतली आहे. भाजपने महापाैर किशाेरी पेडणेकर यांच्याकडेही पत्राद्वारे हीच मागणी केली आहे.