मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख
मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख

मुंबई :  वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या  अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी  महानगरपालिका आयुक्तांंकडे पत्राद्वारे केली आहे.

ठरावीक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना बदलीपात्र असूनही महानगरपालिकेतील पदाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं चित्र मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत सर्रास पहायला मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रात म्हंटले आहे.

कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी  कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत असल्याने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने व काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी. ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करावे, अशी मागणीही शेख यांनी या पत्रात केली आहे.