संजय राठोडांना मंत्री करा, कार्यकर्त्याची यवतमाळ ते मुंबई सायकलवारी

संजय राठोड यांना मंत्री करा, असं म्हणत यवतमाळच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने चक्क यतमाळ ते मुंबई अशी सायकलवारी केली. मुंबईत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्री करा, अशी विनंती पक्षाकडे केली.

    मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते. पुढे पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं.

    दरम्यान यानंतर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं. दरम्यान,आता शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे अशी मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे.

    यतमाळ ते मुंबई अशी सायकलवारी