Malad accident; 9 killed in same house

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बेकायदेशीरपणे उभी राहिलेली चार मजली इमारत अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातामध्ये तब्बल ११ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याच दुर्घटनेमध्ये मोहम्मद रफीक सिद्दीकी यांचे पूर्ण कुटुंबच संपले आहे.

  मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बेकायदेशीरपणे उभी राहिलेली चार मजली इमारत अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातामध्ये तब्बल ११ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याच दुर्घटनेमध्ये मोहम्मद रफीक सिद्दीकी यांचे पूर्ण कुटुंबच संपले आहे.

  धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये मोहम्मद रफींच्या ६ मुलांसह कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफीक सिद्दीकी यांच्या कुटुंबात ११ लोक होते. ज्यामध्ये सहा मुले व चार वयस्कर लोक होते. अत्यंत विदिग्ण्य अवस्थेत ते आहेत. काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे ते एकटेच या दुर्घटनेतून बचावले आहेत. परंतु त्यांनी मानसिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. या अपघातात मोहम्मद यांच्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला.

  इमारत, चाळ की झाेपड्यांवर झोपड्या?

  इमारतीच्या बाजूला सुद्धा धोकादायक इमारत आहे. तेथील रहिवाशांना दुसऱ्या जागी हलवण्यात येत आहे. या भागात इतक्या दाटीवाटीने चाळीवर इमारती बांधल्या आहेत की, इमारत आहे चाळ, की झोपड्यांवर झोपडे बसवले आहे, काहीच कळत नाही. यावर शासन प्रशासन महानगरपालिका लक्ष देईल का? असा प्रश्न या विभागातील संतप्त नागरिक करत आहेत. त्याचबरोबर या घटनेमध्ये जे. जे. जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

  गेल्यावर्षीही दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

  मुसळधार पावसामुळे मालवधीमधील अनधिकृत झोपडीवजा इमारत कोसळल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, या विभागातील केवळ ही एकच अशी घटना नाही, ज्यात प्राणीहानी झाली आहे. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या आहेत, परंतु, पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्यावर्षी याच विभागात इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सुद्धा कारवाई झाली नाही.

  अधिकृत बांधकामांना पेव

  मालवधी विभागात अनधिकृत बांधकामे बिनदिक्कत सुरू आहेत. काही पालिका कर्मचार`यांच`या संगणमताने ही कामे होत आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. येथे सरकारी भूखंडावर अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. पालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता, परिरक्षणचे सहाय्यक अभियत्ता, अधिकारी यांच्या संगणमताने येथे अनधिकृत बांधकामे फोफावत असल्याचा आरोप जागृत नागरिकांनी केला आहे.

  दहा ठिकाणी घर, भिंती कोसळण्याच्या घटना

  मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसात मुंबईत एकूण १० ठिकाणी घर व भिंती काेसळण्याच्या घटन घडल्या आहेत. शहरात ३, पूर्व उपनगरात ४ व पश्िचम उपनगरात ३ घटना घडल्या.