मालाड इमारत दुर्घटना प्रकरण, निवृत्त न्या. जे.पी. देवधर यांची नियुक्ती

मॉन्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबईत इमारत कोसळते कशी? उल्हासनगर आणि मुंबई महापालिका क्षेत्रात महिन्याभरात दोनदा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या असून त्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे यासंदर्भात गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश जारी केले.

    मुंबई : मालाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. जे.पी. देवधर यांची चौकशी आयोगाच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.

    मालाड मालवणी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. त्यात ८ निष्पाप लहान मुलांचाही समावेश होता. त्याची गंभीर दखल घेत मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्वतःहून (सु-मोटो) याचिका दाखल करून घेतली.

    मॉन्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबईत इमारत कोसळते कशी? उल्हासनगर आणि मुंबई महापालिका क्षेत्रात महिन्याभरात दोनदा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या असून त्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे यासंदर्भात गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश जारी केले.

    त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. जे.पी. देवधर यांची चौकशी आयोगाच्या आयुक्तपदी निवड केली. त्याबाबत शुक्रवारी रात्री उशीराने परिपत्रक काढण्यात आले. चौकशी आयोगाला आपला प्राथमिक अहवाल २४ जून रोजी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.