कर्नल प्रसाद पुरोहित
कर्नल प्रसाद पुरोहित

2008 मध्ये या साक्षीदाराने पचमढीतील एका संमेलनात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या व्याख्यानाला उपस्थित होतो असा जबाब दिला होता. यासोबतच पाकिस्तान भारताविरोधात षडयंत्र रचत आहे या मुद्यावरून त्यांच्यासोबत चर्चाही केली होती, असेही त्याने एटीएसला सांगितले होते. तथापि, ज्यावेळी हा साक्षीदार न्यायालयात उपस्थित झाला त्यावेळी त्याने एटीएसकडे यासंदर्भात कोणताही जबाब नोंदविण्यास नकार दिला होता.

    मुंबई : 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका साक्षीदाराने साक्ष फिरविली असल्याची माहिती एनआयएच्या विशेष न्यायालयात वकिलांनी सांगितले. या साक्षीदाराने यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे एक जबाब नोंदविला होता. एनआयएकडे या प्रकरणाची सूत्रे जाण्यापूर्वी एटीएसकडे तपास सुरू होता.

    2008 मध्ये या साक्षीदाराने पचमढीतील एका संमेलनात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या व्याख्यानाला उपस्थित होतो असा जबाब दिला होता. यासोबतच पाकिस्तान भारताविरोधात षडयंत्र रचत आहे या मुद्यावरून त्यांच्यासोबत चर्चाही केली होती, असेही त्याने एटीएसला सांगितले होते. तथापि, ज्यावेळी हा साक्षीदार न्यायालयात उपस्थित झाला त्यावेळी त्याने एटीएसकडे यासंदर्भात कोणताही जबाब नोंदविण्यास नकार दिला होता.

    उलटतपसाणीवेळी त्याने प्रत्येक वेळी ‘माहित नाही’ अशीच उत्तरे दिली. त्यामुळे एनआयए न्यायालयाने साक्ष फिरविलेला साक्षीदार घोषित केले. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोटाच्या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100पेक्षा अधिक जखमी झाले होते.