Gold smuggling case in Kerala; NIA raids in Sangli

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने १८८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून १५० जणांची साक्ष अद्याप नोंदवणे बाकी असल्याची माहिती एनआयएच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

    मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने १८८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून १५० जणांची साक्ष अद्याप नोंदवणे बाकी असल्याची माहिती एनआयएच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

    मालेगाव खटल्यातील आरोंपी विरोधात युएपीएच्या कलमांअंतर्गत खटला चालविण्याचा एनआयए न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी याचिका दाखल केली आहे. या खटल्यातून दोषमुक्त करा, अशी विनंती करताना कर्नल पुरोहित यांनी कनिष्ट न्यायालयातील खटल्याला स्थगिती द्या अशी विनंतीही केली आहे.

    या याचिकेवर न्या. एस.एस.शिंदे आणि न्या. एन.जे जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एनआयच्यावतीने अ‍ॅड सतेश पाटील यांनी विशेष सत्र न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी सुनावणी सुरू असून १८८ साक्षीादर तपासण्यात आले असून सुमारे १५० साक्षीदारांचे जबाब नोदविणे बाकी असल्याची माहिती न्यायालयात दिली.

    तर पुरोहित यांच्यावतीने अ‍ॅड श्रीकांत शिवदे यांनी या प्रकरणी नव्याने काही मुद्दे उपस्थित झाल्याने खटल्यातील आरोंपी विरोधात युएपीएच्या कलमांअंतर्गत खटला चालविण्याला आक्षेप घेणारा अर्ज नव्याने एनआयए न्यायालयात दाखल करण्याची तयारी दर्शविली. तसेच यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या निर्णय रद्द करावा अशी विनंती केली. त्यास एनआयएच्यावतीने अ‍ॅड संदेश पाटील यांनी जोरदार विरोध केला. कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल करायचा असल्यास उच्च न्यायालयातील याचिका मागे घ्यावी अथवा त्यावर गुणवत्तेच्या आधारे सुनावणी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.