मुंबईतील कुपोषित बालके होणार सदृढ; १,२२४ मुलांना काँग्रेसने घेतले दत्तक

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातून ‘१२२४ कुपोषित बालक पोषण आहार दत्तक प्रकल्पाचा’ शुभारंभ करण्यात आला. शताब्दी रुग्णालयामध्येच न्यूट्रिशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

    मुंबई : काँग्रेसने मुंबईतील कुपोषित बालकांना सदृढ करण्याचा विडा उचलला असून तशी घोषण अलीकडेच केली होती. त्यानुसार शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसने शहरातील १ हजार २२४ कुपोषित बालकांना दत्तक घेण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

    भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातून ‘१२२४ कुपोषित बालक पोषण आहार दत्तक प्रकल्पाचा’ शुभारंभ करण्यात आला. शताब्दी रुग्णालयामध्येच न्यूट्रिशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

    शुक्रवारी सकाळी गोवंडी येथील शताब्दी हॉस्पिटलच्या व्ही. बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता, दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या प्रकल्पाबाबतची माहिती मान्यवरांनी कार्यकर्त्यांना सविस्तरपणे दिली.