Man celebrates his birthday by cutting 550 cakes in mumbai kandivali

वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा सध्या ट्रेंड आला आहे. मुंबईतील कांदिवलीतील पश्चिम परिसरात साजरा झालेल्या बड्डेच्या व्हिडिओने सोशल मिडीयावर धिंगाणा घातला आहे. 1,2,3,4,5 नव्हे तर तब्बल 500 केक कापून एका तरुणाने आपला वाढदिवस साजरा केला आहे(Man celebrates his birthday by cutting 550 cakes). बर्थ डे बॉयचे नाव सूर्य रतुरी (SuryaRaturi) असल्याचे समजते. त्याचे सोशल मिडीया अकाऊंट पाहिले असता त्याचे अनेक भाजप नेत्यांसह फोटो दिसतात. या मुळे तो भाजपचा कार्यकर्ता असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    मुंबई : वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा सध्या ट्रेंड आला आहे. मुंबईतील कांदिवलीतील पश्चिम परिसरात साजरा झालेल्या बड्डेच्या व्हिडिओने सोशल मिडीयावर धिंगाणा घातला आहे. 1,2,3,4,5 नव्हे तर तब्बल 500 केक कापून एका तरुणाने आपला वाढदिवस साजरा केला आहे(Man celebrates his birthday by cutting 550 cakes). बर्थ डे बॉयचे नाव सूर्य रतुरी (SuryaRaturi) असल्याचे समजते. त्याचे सोशल मिडीया अकाऊंट पाहिले असता त्याचे अनेक भाजप नेत्यांसह फोटो दिसतात. या मुळे तो भाजपचा कार्यकर्ता असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    कांदिवली स्टेशन जवळ हे हटके बर्थ डे सेलिब्रेशन झाले. दोन मोठ्या टेबलवर रंगीबेरगी, आकर्षक आणि विविध फ्लेवर्सचे 500 केक ठेवण्यात आले होते. बर्थ डे बॉयने एकाच वेळी हे 550 केक कापून आपला वाढदिवस साजरा केला असून सध्या हा व्हिडिओ वायरल झाला आहे.
    या व्हिडिओत हा तरुण दोन्ही हातांनी केट कट करताना दिसत आहे.

    हे अनोखे बर्थ डे सेलिब्रेशन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या वेळीस कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. याठिकाणी सोशल डिस्टन्ससींगचा फज्जा उडाला होता. तर, अनेकांनी मास्कही लावला नव्हता. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीसांनी या बर्थ डे पार्टीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

    1,2,3,4,5 नव्हे तर तब्बल 500 केक कापून साजरा केला वाढदिवस