कांजूरमार्ग कर्वेनगरमध्ये रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

कांजूरमार्ग: कोरोनामूळे आरोग्य सेवेवर मोठा ताण पडला आहे यामुळे इतर आजार असणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अशीच एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना कांजूरमार्ग येथील कर्वेनगर इथे घडली आहे. वेळेवर

कांजूरमार्ग: कोरोनामूळे आरोग्य सेवेवर मोठा ताण पडला आहे यामुळे इतर आजार असणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अशीच एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना कांजूरमार्ग येथील कर्वेनगर इथे घडली आहे. वेळेवर रुग्णवाहिका आणि उपचार न मिळण्यामुळे २५ वर्षीय सुशांत साळुंखे या तरुणाचा मृत्यु झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कांजूरमार्ग कर्वेनगर येथे राहणारा सुशांत साळुंखे हा काही दिवसांपासून क्षयरोगाने त्रस्त होता. शुक्रवारी सकाळी त्याची परिस्थिती खालावली. त्याला रूग्णालयात पोहचवणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने १०८ या रुग्णवाहिकेला असंख्य फोन केले. मात्र रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल ५ तासांपेक्षा जास्त वेळ उपचार न मिळाल्यामुळे सुशांत साळुंखे याचा मृत्यू झाला.