‘भाजप उपाध्यक्ष मनिष भानुशालीला NCB सोबत कारवाई करण्याचा अधिकार आहे का?’ नबाब मलिक यांचा गंभीर सवाल

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता मनिष भानुशाली यानेच ही कारवाई केली असून एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असे सांगत भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

  मुंबई : अंमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी)ने मुंबईत क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप करत गौप्यस्फोट केला आहे की, एनसीबीने क्रूझवर छापा मारलाच नव्हता तर भाजपच्या एका उपाध्यक्षानेच ही कारवाई केली आहे. मलिक यानी सवाल केला आहे की, भाजपच्या कार्यकर्त्याने कोणत्या अधिकारात ही कारवाई केली? एनसीबीही भाजपची शाखा झाली आहे का?

  भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष

  नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता मनिष भानुशाली यानेच ही कारवाई केली असून एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असे सांगत भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

  क्रूझवर छापेमारी नाही, ड्रग्ज सापडले नाहीत

  मलिक म्हणाले की, एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडले नाही, असा दवाही त्यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचे गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी केला. मलिक म्हणाले की, एनसीबीने कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही मग नक्की कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. मलिक म्हणाले की, काही छायाचित्र एनसीबीने जारी केली. त्यात काही अमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून जारी करण्यात आले आहेत. हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफीसचे आहेत. किरण गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? याची एनसीबीने उत्तरे द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  मलिक यांचे गंभीर सवाल

  मलिक यांनी उपस्थित केलेले गंभीर प्रश्न पुढील प्रमाणे  भाजप कार्यकर्ता मनिष भानुशाली क्रूझवर कसा? मनिष भानुशाली हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे का? भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध आहे का? किरण गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? अमली पदार्थांचे व्हायरल झालेली छायाचित्र क्रुझवरील नाहीच?