कोविड दरम्यान १०० कोटी रुपयांच्या योगदानासह फ्रंटलाइन हुतात्मा योद्ध्यांच्या कुटुंबियांना मॅनकाइंड फार्मा कंपनी कडून खारीचा वाटा

मॅनकाइंड फार्मा सुरुवातीपासूनच देशातील सर्व साथीच्या आजाराविरूद्ध लढण्यात सहभागी आहे. २०२० मध्ये मॅनकाइंड फार्मा यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, मुख्यमंत्री केअर फंड, आणि साथीच्या आजाराशी लढाईत सामील झालेल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुमारे १३० कोटी रुपयांची देणगी दिली. कंपनीने देशाला व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) आणि औषधे पुरविली आहेत.

    मुंबई :कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाची दुसरी लाट देशामध्ये पसरत असतानाच,आरोग्यसेवा आणि आघाडीच्या कामगारांनी त्याचा प्रसार रोखण्यासाठी वेळोवेळी धाव घेतलीआहे. या प्रक्रियेत अनेक समर्पित ध्येयवादी नायकांनी आपला जीव गमावला. एक जबाबदार संस्था म्हणून मॅनकाइंड फार्मा या नायकांच्या कुटुंबियांसमवेत उभी आहे आणि त्यांना आधार देण्यासाठी १०० कोटी रुपये देणार आहेत.

    मॅनकाइंड फार्मा सुरुवातीपासूनच देशातील सर्व साथीच्या आजाराविरूद्ध लढण्यात सहभागी आहे. २०२० मध्ये मॅनकाइंड फार्मा यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, मुख्यमंत्री केअर फंड, आणि साथीच्या आजाराशी लढाईत सामील झालेल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुमारे १३० कोटी रुपयांची देणगी दिली. कंपनीने देशाला व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) आणि औषधे पुरविली आहेत. एक अग्रगण्य फार्मा कंपनी असल्याने मॅनकाइंड फार्माने नेहमीच सीएसआर उपक्रमांतून अर्थसहाय्य आणि मानवजातीला सेवा पुरवून एक उत्कृष्ट ब्रँड म्हणून ओळख बनविली आहे.

    मॅनकाइंड फार्माचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजीव जुनेजा म्हणाले,“कोविड-१९ पासून संक्रमित किंवा आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे त्रस्त झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आमचे निर्भय नायक प्रयत्न करीत आहेत. संरक्षणाची पहिली फळी असल्याने त्यांना या प्राणघातक रोगाचा अत्याधिक धोका आहे. साथीच्या आजाराशी लढण्यासाठी आणि आपले संरक्षण करण्यासाठी अनेकांनी आपला जीव गमावला. राष्ट्र आणि मानवतेसाठी त्यांची अमूल्य सेवा विसरली जाणार नाही. त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही या योद्ध्यांच्या कुटुंबियांना सांभाळण्यासाठी व त्यांच्या काळजीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी वचनबद्ध केला आहे. हे आमचे कर्तव्य नाही तर त्यांचे आमच्यावर असलेले एक ऋण आहे. कारण ते खरंच आमची एक आशा आहेत.”