manoj patil parents

साहिल खानवर(Sahil Khan) गुन्हा (Crime)नोंद होऊनही कडक कारवाही होत नाही आहे असं म्हणत राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी करण्यासाठी आज मनोज पाटील यांच्या आई वडील आणि भावाने राजगड येथे मनसे नेत्यांची भेट घेतली.

    शरीर सौष्ठव मनोज पाटील(Manoj Patil) याने आपला मानसिक छळ(Mental Harassment) होत असल्याच म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अभिनेता साहिल खान(Sahil Khan) यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचं मनोज यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये(Manoj Patil Suicide Note) म्हटलं होतं. साहिल खान यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण तरी देखील साहिल खानवर गुन्हा नोंद होऊनही कडक कारवाही होत नाही आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी करण्यासाठी आज मनोज पाटील यांच्या आई वडील आणि भावाने राजगड(manoj Patil`s parents At Rajgad) येथे मनसे नेत्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मनसे मनोजला पूर्ण पाठिंबा देणार असल्याच मनसेने स्पष्ट केलंय . शालिनी ठाकरे यांनी देखील मनसे मनोज यांच्या पाठीशी असल्याचं म्हटल्याचं मनोज यांच्या आईने म्हटलंय .

    मनोज देशासाठी पदक मिळवू इच्छितोय , त्याला त्रास न देता पुढे जाऊ द्यायला हवं , असं म्हणत मराठी माणसाच्या मनसे पाठीशी उभी राहील आणि आपल्याला त्यांच्याकडून न्यायची अपेक्षा असल्याचं मनोज पाटील यांच्या आई वडिलांना आहे. त्यामुळे आपण मनसे अध्यक्षांची भेट घेऊ इच्छित असल्याचं मनोज पाटील यांच्या आईवडिलांनी म्हटलं .