fadnavis

मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या नंतर या प्रकरणात चौकशी होईपर्यंत वाझे यांचे निलंबनाच्या मागणीवरुन सभागृहात अभूतपूर्व गोँधळ झाला.

  मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण- पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनावरुन सभागृहात अभूतपूर्व गोँधळ, दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी होणार आहे.  तर, गृहमंत्र्यांच्या हेतूवर फडणवीसांनी घेतला संशय घेतला आहे.

  मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या नंतर या प्रकरणात चौकशी होईपर्यंत वाझे यांचे निलंबनाच्या मागणीवरुन सभागृहात अभूतपूर्व गोँधळ झाला.

  फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी सभागृहात केल्यानंतर, सत्ताधाऱ्यांकडून खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणात त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. दोन वेळा सभागृह तहकूब झाल्यानंतर मनसुख प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख बोलण्यास उभे राहिले.

  यावेळी त्यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली. डेलकर यांना प्रशाक प्रफुल्ल खेडा पटेल आणि अन्य अधिकारी त्रास देत होत असल्याचे त्यांच्या मृत्पूर्वीच्या पत्रात म्हटल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी सचिन वाझे यांचे काय असा सवाल उपस्थित केला. सचिन वाझे हे शिवसेनेशी संबंधित आहेत, आणि या प्रकरणात वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांवरच फडणवीस यांनी शंका उपस्थित केली.

  यानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी कशी आली आणि फडणवीस यांना सीडीआर रिपोर्ट कसा मिळाला, अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्यावरुन आपली चौकशी करा, असे सांगत फडणवीस यांनी सरकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले.

  वाझे यांच्या निलंबनावर निर्णय होत नसल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे सरकार खूनी है, अशा घोषणा दिल्या. तर भास्कर जाधव यांनी वाझे फडणवीसांचं सत्य उघड करतील म्हणून, त्यांच्यावर निलंबनाती मागणी होत असल्याचे सांगत वाझेंची पाठराखण केली.

  यावरुन अन्वय नाईक यांच्या प्रकरणाचा उल्लेख गृहमंत्र्यांनी करत, फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप केला. तर, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या हत्येसाठी महाराष्ट्र हे पर्यटन डेस्टिनेशन तयार होते आहे का? असा सवाल करताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केले.

  याच गदारोळात सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनाचे कामकाज सुरु ठेवले. अखेर झालेल्या गोधळानंतर सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आले. सकाळीही यावरुन सभागृहात गोँधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा तहकूब करण्यात आले. यानंतर या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्यानंतरही तांत्रिक कारणावरुन सभागृह दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले होते.