Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

    मुंबई : संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ अद्यापही कायम आहे. या प्रकरणाचा एनआयए अनेक दिवसांपासून तपास करत आहे. मात्र मनसुख हिरेन यांचा मृत्यू नक्की कसा झाला याचा छडा लावण्यात त्यांना अपयश आले आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही. अशी नवी माहिती अवहालातून समोर आली आहे.  यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.

    २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक आढळून आली. यानंतर या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्कॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदरच्या खाडीत संशयास्पदरित्या आढळून आला. यानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली.