मनसूख हिरेन हत्या प्रकरण; परमबीर विरोधात एनआयएकडे बक्कळ पुरावे, आरोपपत्रात समावेश

चौकशीदरम्यान एनआयएला एक गूगल अकाऊंटबाबत माहिती मिळाली, ज्याचा वापर फेसटाईम चालविण्यासाठी करण्यात आला होता आणि त्याच आयडीचा वापर करून आरोपींसोबत संपर्क केला जात होता. एनआयएने याबाबत आरोपपत्रात जोडलेल्या पुराव्यांवरून परमबीर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्यांकाडांचा कट रचल्याचा संशय आणखी वाढत चालला आहे. तथापि, एनआयएने आपल्या आरोपपत्रात परमबीर यांचे थेट नाव घेतले नाही, मात्र असे अनेक पुरावे जोडलेले आहे, ज्यामुळे परमबीर यांच्याकडे संशयाची सूई वळते आहे.

    परमबीर फेसटाईम आयडीचा वापर करून याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात होते, असा आरोप केला जात आहे. फेसटाईम आयडीतील पहिले नाव कुरकुरे आणि अखेरचे नाव बालाजी असे होते.