उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास सुरू आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्काॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदर येथे आढळून आला होता. त्याचाही तपास एटीएसकडून करण्यात येत असून त्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब गुरुवारी नोंदवण्यात आला.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास सुरू आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्काॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदर येथे आढळून आला होता. त्याचाही तपास एटीएसकडून करण्यात येत असून त्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब गुरुवारी नोंदवण्यात आला.

    गृहमंत्री देशमुख यांनी वाझे यांची क्राइम ब्रांच मधून तूर्तास बदली करण्यात आल्याचे सभागृहात जाहीर केले होते. एटीएसने तब्बल १० तास त्यांची चौकशी करून जबाब घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    एटीएस चौकशीदरम्यान वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ज्यावेळेस सापडली होती, त्या घटनेपूर्वीपासून ठाण्यात राहणाऱ्या हिरेन मनसूख यास आपण ओळखत होतो, अशी कबुली दिली. मात्र, त्याच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, असे म्हणत त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.