Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

मनसुख हिरेन प्रकरणात अखेर शवविच्छेदन अहवाल एनआयएला प्राप्त झाला असून हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हिरेन यांच्या मृत्यूनंतर तपासाला वेग आला असून प्राप्त झालेल्या अहवालात हिरेन यांच्या फुफ्फुसात खाडीतील पाणी आढळले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

    मुंबई :  मनसुख हिरेन प्रकरणात अखेर शवविच्छेदन अहवाल एनआयएला प्राप्त झाला असून हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हिरेन यांच्या मृत्यूनंतर तपासाला वेग आला असून प्राप्त झालेल्या अहवालात हिरेन यांच्या फुफ्फुसात खाडीतील पाणी आढळले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

    तथापि त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे मात्र गूढ उकललेले नाही. यापूर्वीही एक धक्कादायक खुलासा झाला होता. त्यात मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला एक सेंटीमीटर बाय एक सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आढळल्या होत्या. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांनीही संशय व्यक्त केला होता.

    दरम्याम, मनसूख हिरेन हत्येचे प्रकरण एटीएसकडे आहे. एटीएसने कारवाई केली नाही. जर, माझ्याकडे इतके पुरावे आहेत तर पोलिसांजवळ खूप पुरावे आहेत. मनसुखची आवाजाची टेप तपास यंत्रणांकडे आहे. त्यात वाझेंचाही आवाज आहे. इतके सारे पुरावे असताना, तपासाला पुरेसी गती मिळताना दिसत नाही आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण या दोन्ही घटना एकमेकांशी कनेटक्टेड आहेत. ही दोन्ही प्रकरणे एनआयने स्वत:तकडे घेतली पाहिजेत आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयकडे गेला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    वाझे यांच्यावर एक्स्टॉर्शनचे आरोप आहेत, त्याच भागात हिरेन यांना बोलवण्यात आले. त्यांतर त्यांचा मृतदेह आढळला. हिरेन यांना हाय टाईडमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न केला गेला. हिरेन यांचा यांच्या तोंडात रुमाल टाकले गेले. हिरेन यांची हत्या झाली. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिलेले आहे की हिरेन यांच्या फुप्फुसात पाणी नाही. त्यांनी जर खाडीत आत्महत्या केली असती तर त्यांच्या फुफ्फुसात पाणी गेले असते. पण तसे नाही. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली, असे फडणवीस म्हणाले.