parambeer singh

मुंबईचा पोलीस आयुक्त (Mumbai police commissioner)बनण्याचे स्वप्न प्रत्येक पोलीस अधिकारी बघत असतो. ज्युलिओ रिबेरो, डी.एस सोमण, वसंत सराफ, रॉनी मेंडोसा सारख्या अधिकाऱ्यांनी या पदाला एक सन्मान मिळवून दिला आहे.

    मुंबईः मुंबई पोलीस(Mumbai police) आयुक्त पदाला राज्यामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा आहे. पण हा एक काटेरी मुकूट आहे. या पदावर आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली होण्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली आहेत. या यादीत सुपरकॉप राकेश मारिया, डॅशिंग अधिकारी अरुप पटनायक यांच्यानंतर  परमबीर सिंग(parambeer singh) यांचेही नाव जोडले गेले आहे.

    मुंबईचा पोलीस आयुक्त बनण्याचे स्वप्न प्रत्येक पोलीस अधिकारी बघत असतो. ज्युलिओ रिबेरो, डी.एस सोमण, वसंत सराफ, रॉनी मेंडोसा सारख्या अधिकाऱ्यांनी या पदाला एक सन्मान मिळवून दिला आहे.

    मुंबईचा पोलीस आयुक्त असलेला अधिकारी सत्ताकेंद्र असलेल्या नेत्यांच्या नेहमी जवळ असतो. त्यामुळे त्याचे वादही सरकारपर्यंत लगेच पोहोचतात.परिणामी त्यांना बदलीच्या निर्णयाला सामोरे जावे लागते.

    मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगही यांना अंबानींटच्या घराजवळ स्फोटके सापडल्याचे प्रकरण  भोवले आहे. मात्र असे एखाद्या प्रकरणानंतर  पोलीस आयुक्तांना हटवण्याचे  हे काही पहिले प्रकरण नाही. याआधी राकेश मारिया यांनाही शीना बोरा प्रकरणानंतर पदावरून हटवण्यात आले.  अरुप पटनायक यांचीही आझाद मैदान दंगलीनंतर बदली करण्यात आली. १९९२ च्या दंगलीनंतर पोलीस आयुक्तांची बदली करून सामरा यांना आणण्यात आले होते.आरएस शर्मा त्यावेळी महासंचालक पदाच्या स्पर्धेत होते. मात्र तेलगी प्रकरण त्यांना भोवले. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही.