siddhivinayak temple
siddhivinayak temple

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात राज्य सरकारने बार सुरु कले आणि मंदिर बंद ठेवलेत. राज्यातील प्रमुख धर्माचार्य विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक व अध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे येत्या १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ८ महिन्यांपासून राज्यातील मंदिरे ( temples) , धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ( religious and spiritual organizations) बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु आता राज्य अनलॉक होत असताना राज्यातील सर्व मंदिर खुली करा अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. यासाठी येत्या १३ ऑक्टबरला राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायाचे साधु-संत आणि अनेक धार्मिक आणि अध्यात्मिक संघटना उपोषण करणार आहे. या उपोषणाला भाजपने पाठिंबा (BJP will support) दिला असून कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात राज्य सरकारने बार सुरु कले आणि मंदिर बंद ठेवलेत. राज्यातील प्रमुख धर्माचार्य विविध संप्रदायांचे साधु-संत, अनेक धार्मिक व अध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे येत्या १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मंदिर व धार्मिक स्थळांवर विविध सांप्रदायाचे साधु-संत, धर्माचार्य, पुरोहीत उपोषणात सहभाग होणार आहेत. फूल-प्रसाद विक्रेते, मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक हे सुद्धा उपोषणात सहभागी होणार आहेत.