मुंबईत लोकल प्रवासासाठी वाट्टेल ते ! बोगस ओळखपत्रांचा सुळसुळाट, अनेकांवर कारवाई

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याोग वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केवळ सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील रुग्णांसाठी मुंबई लोकल सुरू ठेवण्यात आलीय. मात्र अनेकजण बोगस ओळखपत्र दाखवून लोकलमध्ये प्रवेश मिळवत असल्याचं दिसून आलंय. 

    देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दैनंदिन ३ लाखांच्या वर रुग्णांची संख्या पोहोचली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी कुठे कडक तर कुठे सौम्य निर्बंध लावण्यात आलेत.

    मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याोग वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केवळ सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील रुग्णांसाठी मुंबई लोकल सुरू ठेवण्यात आलीय. मात्र अनेकजण बोगस ओळखपत्र दाखवून लोकलमध्ये प्रवेश मिळवत असल्याचं दिसून आलंय.

    मुंबईत २३ एप्रिलपासून सामान्य प्रवाशांच्या रेल्वे प्रवासावर बंधनं घालण्यात आलीयत. त्यानंतर गेल्या ३ दिवसांत बनावट ओळखपत्र दाखवणाऱ्या ९७ जणांवर कारवाई करण्यात आलीय. बोगस ओळखपत्रांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे विविध हॉस्पिटल्सच्या ओळखपत्रांचं आहे. गुरुवारपासून मुंबई लोकलमधून प्रवास करायला सरकारी कर्मचारी, रुग्णालयांचे कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यांनाच परवानगी आहे. याचाच गैरफायदा घेत अनेकजण हॉस्पिटल्सच्या नावाची बोगस ओळखपत्रं बनवत असल्याचं लक्षात आलंय.

    रेल्वेचा प्रवास सर्वात जलद आणि स्वस्त असल्यामुळे प्रवासी लोकल प्रवासालाच प्राधान्य देतायत. मात्र त्यामुळे सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण होत असल्यामुळे अशा बोगस ओळखपत्रधारकांवर कडक कारवाई करण्याची गरज सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरदेखील अशी बोगस ओळखपत्रधारकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आलीय.