Many were lobbying for the post of Mumbai Congress president; Finally the appointment of Bhai Jagtap

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हे खांदेपालट करण्यात आले असल्याचे समजते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु होती. वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख या शर्यतीत होते. अखेरीस भाई जगताप यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून शनिवारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाली आहे. तर, चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हे खांदेपालट करण्यात आले असल्याचे समजते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु होती. वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख या शर्यतीत होते. अखेरीस भाई जगताप यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

दरम्यान, मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे, अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती, अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी), गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.