pandharpurn maratha kranti morcha

मराठा आक्रोश मोर्चा अडवण्यात आल्यावर पोलीसांनी मराठा कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. यामुळे वातावरण आणखी तापले. आता पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरु असल्याचे माहिती मिळत आहे. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीर पंढरपूरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त सकाळपासून तैनात केला आहे.

पंढरपूर : मराठा ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा  (Akrosh Morcha) काढण्यात आला. सकाळी पंढरपूरमध्ये नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन सकल मराठा समाजाच्या (Maratha community) पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. या मोर्चाला सुरुवात झाल्यावर काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परंतु पंढपूर येथील पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा आडवण्यात आला आहे.

मराठा आक्रोश मोर्चा अडवण्यात आल्यावर पोलीसांनी मराठा कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. यामुळे वातावरण आणखी तापले. आता पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरु असल्याचे माहिती मिळत आहे. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीर पंढरपूरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त सकाळपासून तैनात केला आहे. तसेच संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पंढरपूर पोलिसांनी मराठा आक्रोश मोर्चाच्या पायी दींडीला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मराठा समन्वयकांना ताब्यात घेतलं असून त्यांना पुण्याच्या दिशेने नेण्यात आले आहेत. पुण्यामध्ये पोहचल्यावर मुख्य सचिवांसोबत मराठा समन्वयकांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.