अनिल देशमुखांच्या विरोधात लढणाऱ्या ऍड. जयश्री पाटलांविरोधात मराठा मोर्चा आक्रमक, बोलविता धनी उघड करण्याचा इशारा

ऍड. जयश्री पाटील यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार असून तिथे निकाल लागताच, ऍड. पाटील यांचा बोलविता धनी कोण, ते आम्ही उघड करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. 

    मराठा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा सध्या ऍड. जयश्री पाटील यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. ऍड. पाटील यांच्यामुळे मराठा समाजाची बदनामी झाली असून हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीय.

    ऍड. जयश्री पाटील यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार असून तिथे निकाल लागताच, ऍड. पाटील यांचा बोलविता धनी कोण, ते आम्ही उघड करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

    असे आहे प्रकऱण

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले होते. त्याचवेळी ऍड. जयश्री पाटील यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून अनिल पाटील यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

    अनिल देशमुख कितीही पॉवरफुल मराठा नेते असले तरी कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असा दावा पाटील यांनी केला होता. यापूर्वी मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला आक्षेप घेत ऍड. जयश्री पाटील यांनी वारंवार याचिका दाखल केल्या आहेत. मराठा आरक्षणाला त्यांनी वारंवार विरोध केला आहे.