Finally reservation for Maratha community, opposition of MP Sambhaji Raje

निवड झालेल्या मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रुजू करून न घेतलेल्या २१८५ मराठा तरुणांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यातील हजारो मराठा तरुणांनी पाठिंबा दिलाय. आझाद मैदानावरील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून हजारो वाहनधारकांचा मोर्चा मुंबईत येण्याच्या तयारीत आहेत.

मराठा आरक्षणाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्धगिती दिलीय. मात्र ही स्थगिती मिळण्यापूर्वी आरक्षणाच्या निकषावर मराठा तरुणांची निवड करण्यात आली होती. अशा प्रकारे निवड झालेल्या मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रुजू करून न घेतलेल्या २१८५ मराठा तरुणांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाला राज्यातील हजारो मराठा तरुणांनी पाठिंबा दिलाय. आझाद मैदानावरील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून हजारो वाहनधारकांचा मोर्चा मुंबईत येण्याच्या तयारीत आहेत. मात्र रविवारपासूनच पोलिसांनी नवी मुंबईच्या सीमेवर वाहनांना अडवायला सुरु केली आहे. त्याचबरोबर राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. मात्र त्यापूर्वी राज्यात मराठा आरक्षण लागू होऊन नोकरभरती सुरू झाली होती. या कायद्यानुसार मराठा समाजातील २ हजार १८५ तरुण तरुणींची विविध खात्यांमध्ये निवडदेखील करण्यात आली. मात्र त्यांची नियुक्ती होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. यामुळं या तरुणांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केलंय.

आजपासून (सोमवार) विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते विधानभवनावर वाहन मोर्चा आणण्याच्या तयारीत आहेत. मात्र सरकारनं रविवारपासूनच मुंबईच्या वेशीवर वाहनांची धरपकड सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तर महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केलाय.