मराठा आरक्षण राजकीय विषय नाही, फडणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही वापरलेत : अशोक चव्हाण

मराठा समजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. मराठा आरक्षण हा राजकीय विषय (political issue) असूच शकत नाही. तसेच फडणवीस सरकारने ( Fadnavis government) घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहे. मराठा समजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

बैठकीत मराठा आरक्षणच्या मुद्दयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी होते. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी बैठकीत झालेल्या मुद्दयांवर भाष्य केले आहे. या बैठकीत मागील १० ते १२ दिवसांपासूनचे हायकोर्टाचे निर्णय आलेले आहेत.

याच निर्णयावर चर्चा करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी ईड्ब्लूएस किंवा एससीबीसी या दोघांपैकी एक काहीतरी घ्या असे कोर्टाच्या निर्णयात म्हटले आहे. तसेच ईडब्लूएस बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली. खासदार संभाजीराजे आज भेटणार आहेत. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.