मुंबईत पुन्हा पेटला मराठीचा मुद्दा.. मनसे, शिवसेना आक्रमक

मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे ( Shobha Deshpande) कुलाबा (colaba) येथील महावीर ज्वेलर्स दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी दुकानदार त्यांच्याशी हिंदीतून (Hindi) बोलत असल्यामुळे त्यांनी मराठीतून (Marathi) बोलण्याची विनंती केली. मात्र दुकानदारानं मराठीतून बोलण्यास नकार (Denial) दिला. दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

मुंबई : मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे ( Shobha Deshpande) कुलाबा (colaba) येथील महावीर ज्वेलर्स दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी दुकानदार त्यांच्याशी हिंदीतून (Hindi) बोलत असल्यामुळे त्यांनी मराठीतून (Marathi) बोलण्याची विनंती केली. मात्र दुकानदारानं मराठीतून बोलण्यास नकार (Denial) दिला. दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

या आंदोलनानंतर मनसे (MNS) आणि शिवसेना (SHIV SENA) कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कुलाबा गाठल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत शोभा देशपाडे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच, सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले आणि मनसेकडून या दुकान मालकाला मारहाणही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मनसे आणि शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसत आहे. परंतु आता या दुकान मालकावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा शोभा देशपांडेंना फोन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे यांना फोन लावला. तसेच या प्रकराबाबत तुमचं म्हणणं योग्यच आहे. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. आज पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली आहे.