face mask

मुंबई : मुंबईत लोकल प्रवासासाठी अनेक गटांना आता परवानगी देण्यात आली आहे. काही विशिष्ट वेळेत सर्वांनाच प्रवासासाठी परवानगी द्या, अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली होती. आता रेल्वे त्यावर निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेल्वे पोलिसांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. रेल्वेत मास्क न घालता प्रवास केला तर हा दंड होणार आहे.(mask compulsory in local train) त्यामुळे लोकलने प्रवास करणार असाल तर मास्क विसरणार नाही याची काळजी घ्या नाहीतर जबर दंड होऊ शकतो.

महापालिकेने यासंदर्भात दंडाची जी तरतूद केली आहे त्यानुसार रेल्वे पोलीस आता दंड आकारू शकणार आहेत. सरकारने अनेकदा सांगूनही प्रवासी मास्कशिवाय प्रवास करत असल्याचं आढळून आल्याने प्रशासनाने ही कडक भूमिका घेतली आहे.

मास्क घातला नाही तर २०० रुपये दंडाची तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. हा दंड दुप्पट वाढविण्याचाही सरकारचा विचार असल्याचं बोललं जात आहे.

आम्ही आधी जे पत्र दिले ते गर्दी होऊ नये याचा विचार करून पत्र दिले आहे. मुख्य सचिव आज चर्चा करून तोडगा काढतील. योग्य चर्चा करून रेल्वे बरोबर बसून मार्ग काढू. नवीन काही योजना आणायची नाही. रेल्वेचं काही म्हणणं असेल तर विचार करू.  – अस्लम शेख, पालकमंत्री