मानखुर्दमध्ये स्क्रॅब असोसिएशनमधील एका भंगारच्या गोदामाला भीषण आग

मुंबई : साकीनाक्यातील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडळा परिसरातील स्क्रब असोसिएशन मधील एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही घटना आज पहाटेच्या सुमारास

मुंबई : साकीनाक्यातील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडळा परिसरातील स्क्रब असोसिएशन मधील एका भंगारच्या गोदामाला  भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.  या घटनेत असंख्य झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तैनात करण्यात आल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या मंडला भागातील झोपडपट्टी वस्तीत आज पहाटे अचानक आग लागली. आगीची भीषणता इतकी मोठी होती कि धुरांचे लोन आकाशात पसरले होते. मात्र या झोपडपट्टीत असलेल्या एका स्क्रॅब गोदामाला आग लागल्यामुळे या झोपडपट्टयांना आग लागली आहे. परंतु ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.