मुंबईतील लाकडाच्या गोदामाला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील गोरेगाव येथील रेल्वे स्टेशनांजवळील दुकानांना भीषण आग लागली आहे. लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच धुराचे मोठे लोट देखील परिसरात पसरत असल्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मुंबई :  मुंबईतील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या दरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील रेल्वे स्टेशनांजवळील दुकानांना भीषण आग लागली आहे. लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच धुराचे मोठे लोट देखील परिसरात पसरत असल्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.