मुंबईच्या रघुवंशी मिलमध्ये भीषण आग

मुंबई : मुंबईतील लोअर परेल येथे असलेल्या रघुवंशी मिलमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आगीची तीव्रता प्रचंड

मुंबई : मुंबईतील लोअर परेल येथे असलेल्या रघुवंशी मिलमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आगीची तीव्रता प्रचंड प्रमाणात मोठी असल्यामुळे, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु स्काय लाउजला ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रघुवंशी मिलमधील पी टू या इमारतीच्या पहिल्या मजल्यात आग पसरली असून, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. परंतु ही आग कशामुळे लागली ? याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये.