Chakamakfame Daya Nayak shifted to Tadkafadki at Gondia; Another Thane officer transferred to Gadchiroli

दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती(Stay on Daya Nayak Transfer) देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक ( Daya Nayak Transfer) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती(Stay on Daya Nayak Transfer) देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

    दया नायक यांची बदली करण्यात आली होती. त्यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होतं. पण आता दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याचे समजते. नायक यांची आधी बदली प्रशासकीय कारणामुळे करण्यात आली  नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करत, त्यांची रवानगी गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती.

    मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसमार्फतही करण्यात येत होता. एटीएस मार्फत या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण ६ टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत होते. गेल्या वर्षी राज्यातील मोठ्या नेत्यांना आलेल्या धमक्यांच्या प्रकरणातही दया नायकच तपास करत होते.