narendra patil

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळीचे प्रश्न समजून घेऊन मंत्र्यांना त्यासंदर्भात आदेश देणे गरजेचे होते. पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी (narendra patil angry on chief minister)व्यक्त केली.

    मुंबई : माथाडींच्या प्रश्नांबाबत खूपदा मागणी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी ना कधी चौकशी केली ना कोणती बैठक बोलावली. आता मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याबाबतदेखील शिवसैनिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे मला आता शिवसेनेत काम करता येणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे, असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

    मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडीच्या प्रश्‍नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती आपण केली होती. पण कोणतीही बैठक घेण्यात आली नाही. पुढे मुख्यमंत्र्यांनी मला एपीएमसी मार्केट सुरू करा म्हटले. त्यानंतर एपीएमसी मार्केट सुरू करण्यात आले.  माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांमध्ये समावेश करण्याची विनंती मी केली. मात्र त्यांना माथाडींच्या प्रश्नांविषयी बोलण्यासाठी  वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात कमी पडत आहेत.

    महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळीचे प्रश्न समजून घेऊन मंत्र्यांना त्यासंदर्भात आदेश देणे गरजेचे होते. पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल, तर मी वेगळा राहिलेलाच बरा, असे म्हणून पाटील यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. मी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे शिवसेनेत गेलो होतो, असेही ते म्हणाले.

    उदयनराजे भोसलेंना भेटलो किंवा देवेंद्र फडणवीसांना भेटलो तर तो माझा वैयक्तिक विषय आहे. याचा शिवसेनेशी काही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले.