मावळचा गोळीबार पोलिसांच्या हातातून बंदुका खेचून नेत्यांच्या मुलांनी केला नव्हता; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Housing Minister Jitendra Awhad) यांनी माध्यमांसमोर बोलताना विरोधीपक्षांकडून मावळ गोळीबाराचा वारंवार उल्लेख करण्याला आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, मावळमधील घटनेत न्यायाधिशांनी केलेल्या चौकशीत गोळीबार कसा गरजेचा होता ते मान्य केले होते. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला. पोलिसांच्या हातातून बंदुका खेचून नेत्यांच्या मुलांनी गोळीबार केला नव्हता असे आव्हाड यानी म्हटले आहे.

  मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Housing Minister Jitendra Awhad) यांनी माध्यमांसमोर बोलताना विरोधीपक्षांकडून मावळ गोळीबाराचा वारंवार उल्लेख करण्याला आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, मावळमधील घटनेत न्यायाधिशांनी केलेल्या चौकशीत गोळीबार कसा गरजेचा होता ते मान्य केले होते. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला. पोलिसांच्या हातातून बंदुका खेचून नेत्यांच्या मुलांनी गोळीबार केला नव्हता असे आव्हाड यानी म्हटले आहे.

  राज्यात सत्ताधारी तीन पक्षांनी लखीमपूर खेरीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद केल्यानंतर विरोधी पक्षांकडून देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यानी मावळ गोळीबाराची आठवण करुन देत शेतकऱ्यांसोबत झालेली ही घटना खऱ्या अर्थाने जालियनवाला बाग हत्याकांड आहे, असे म्हटले होते. त्यावर माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

  अमानवीय कृत्याचे दु:ख व्यक्त करणारा बंद

  लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. अमानवीय कृत्याचे दु:ख होणे यात माणसुकीच दर्शन आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज हा त्या घटनेतून दिसला. गोरगरीब शेतकरी रस्त्यावर उभा आहे आणि मागून येऊन जीप त्यांच्या अंगावर घालायची आणि नऊ जणांना चिरडून मारुन टाकायचे त्याबद्दल वाईट वाटणार नसेल, तर तशी महाराष्ट्राची संस्कृती नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  तर माणसुकी, जिवंतपणा दिसला असता

  शेतकरी कुठलाही असो, शेवटी ते देशाचा शेतकरी आहे. देशासाठी अन्न पिकवतो. उत्तर प्रदेशात ज्या भागात हे घडले, तिथे सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर होणार दु:ख दाखवायचे की नाही. तुमच्यालेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच यातून दिसते अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांवर केली. “ज्यांना चिरडून मारले, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली असती, तर माणसुकी दिसली असती, जिवंतपणा दिसला असता, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.