ऑर्थर रोड कारागृह अन् पोलिस वसाहतीची महापौर किशोर पेडणेकर यांनी केली पाहणी

मुंबई : ऑर्थर रोड कारागृहातील कैदी व पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, मुंबईच्या महापौर किशोर किशोर पेडणेकर यांनी आज दिनांक १० मे २०२० रोजी ऑर्थर रोड कारागृह व लगतच्या पोलिस वसाहतीला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.

     ऑर्थर रोड तुरुंगाच्या संपूर्ण परिसराची पाहणी झाल्यानंतर महापौरांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापौर  किशोरी किशोर पेडणेकर संवाद  साधताना  म्हणाल्या की,ऑर्थर रोड कारागृहात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस हे अत्यावश्यक सेवेत   येत असून या सर्वांना चांगली आरोग्य सेवा देणे हे प्रथम कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासोबतच या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याची सूचना महापौरांनी  यावेळी जी/ दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या संपूर्ण कोरोना  बाधित परिसराकडे विशेष लक्ष  देऊन आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याची सूचना महापौरांनी यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना केली. त्याचप्रमाणे आपल्याला काही अडचणी असल्यास महापौरांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन महापौरांनी उपस्थितांना शेवटी केले.