kishori pednekar

शिवाजी पार्कमध्ये(shivaji park) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना महापाैर किशाेरी पेडणेकर(mayor kishori pednekar) यांनी आज दुपारी दाेन हजार मास्कचे(mask distribution) वितरण केले.

    मुंबई: शिवाजी पार्कमध्ये(shivaji park) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना महापाैर किशाेरी पेडणेकर(mayor kishori pednekar) यांनी आज दुपारी दाेन हजार मास्कचे(mask distribution) वितरण केले. शाळा कॉलेज बंद असल्याने आम्हाला खेळू द्या, लॉकडाऊन करू नका अशी मागणी महापाैरांकडे आज विद्यार्थ्यांनी केली.

    महापाैरांनी आज शिवाजी पार्क परिसरात मास्कचे वितरण करताना काही विद्या्र्थ्यांशी संवाद साधला. शिवाजी पार्क मैदानात शेकडाे मुले खेळण्यासाठी येतात. लॉकडाऊन जाहीर हाेण्याची भिती असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत. शाळा बंद असल्याने मुलांना खेळण्यासाठी आता मैदाने उपलब्ध आहेत. लॉकडाऊन झाल्यास मैदानात खेळणे बंद हाेईल. अशी भिती वाटत असल्याने मुलांनी लॉकडाऊन करू नका अशी मागणी महापाैरांकडे केली.

    यावेळी अनेक तरूण, मुले तसेच वयाेवृध्द विनामास्क फिरताना दिसले, काही ताेंडाला रूमाल बांधून फिरत हाेते. त्या सर्वांना मास्कचे वितरण केले. मास्कशिवाय फिरू नका, आपले आराेग्य जपा, सुरक्षित रहा आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा असे आवाहन महापाैरांनी यावेळी केले.